Headlines

अनेक वर्षे मीटर रीडिंग घेणाऱ्यानाच काम दया..

संजय पडते यांची पालकमंत्री, खासदार यांच्याकडे मागणी

*💫कुडाळ दि.२९-:* गेली विस वर्षे मिटर रीडिंगची कामे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणी करीत आहेत यापुढेही त्यांनाच कामे मिळाली पाहिजे अशी मागणी खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांच्याकडे केलेली असुन आज कार्यकारी अभियंता म्हणून आपणाकडे करीत आहोत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी मराविमचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्या कडे केली खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या सह जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, शिवसेनेचे अतुल बंगे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज मिटर रीडिंग घेणारे स्थानिक कंत्राटदार यांनी आज कार्यकारी अभियंता पाटील यांची भेट घेऊन सांगितले की आॅनलाईन टेंडर मुळे इथल्या स्थानिक लोकांच्या रोजी रोटीवर परीणाम होत असुन ही कामे स्थानिक लोक करीत आले आहेत त्यांनाच मिळाली पाहिजे तशा सुचना पालकमंत्री ना उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी दीलेल्या आहेत त्यामुळे स्थानिक लोकांचा विचार व्हावा अशी मागणी पडते यांनी केली

You cannot copy content of this page