*💫मालवण दि.२९-:* वायरी भूतनाथ येथील पर्यटन व्यावसायिक रमेश विष्णू पाटकर (वय ४२) यांचे वायरी भूतनाथ येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, असा परिवार आहे. रमेश हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यटन व्यावसायिक रमेश पाटकर यांचे निधन…
