बांदा केंद्र शाळेत शाहू महाराजांना अभिवादन…!

⚡बांदा ता.२६-: समतेची शिकवण देणाऱ्या ल़ोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १५१वी जयंती पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत स्काऊट गाईड पथकामार्फत उत्साहात साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या भाषणातून शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.शुभम झोरे,आयुष असनकर, समर्थ नार्वेकर, हर्षद ठाकूर, साईदत्त कर्पे,विहान गवस,नाजूका खान, तेजस्वी गुरव,सई गवंडळकर,जिविका पाडलोसकर,शभ्रा म्हाडगुत,दुर्गा लोके या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पदवीधर शिक्षक उदय सावळ, रंगनाथ परब,जे.डी.पाटील ,फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी ,जागृती धुरी, मनिषा मोरे‌, कृपा कांबळे, प्रसन्नजित बोचे, सुप्रिया धामापूरकर‌ यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page