बांदा केंद्र शाळेच्या स्वामिनी तर्पेची नवोदय विद्यालयात निवड…

⚡बांदा ता.२६-: पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेतील स्वामिनी लक्ष्मण तर्पेची हिची नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झाली असून तिला शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात जवाहर नवोदय विद्यालयात निवड करणेसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने राबविलेल्या या परीक्षेसाठी सहावीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळत असते .गेल्या पाच वर्षांत बांदा प्रशालेतील जवळपास पंधरा विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झालेले आहेत . स्वामिनी हिला मुख्याध्यापक शांताराम असनकर, वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत,पदवीधर शिक्षक उदय सावळ,जे.डी.पाटील , रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, स्नेहा घाडी,जागृती धुरी, मनिषा मोरे‌ कृपा कांबळे ,प्रसन्नजित बोचे, सुप्रिया धामापूरकर‌ यांचें मार्गदर्शन लाभले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्ष संपदा सिध्दये व पालक यांनी अभिनंदन केले असून स्वामिनी हिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page