श्री.विक्रांत सावंत यांच्या हस्ते बुदधिबळ स्पर्धेचे उदघाटन संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.२६-: विकासभाई सावंत यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे 21 वर्षाखालील मुलांसाठी घेण्यात आलेल्या बुदधिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी विधानसभेतील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली.

पहीली ते काॅलेजच्या ब्याऐशी मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान आणि मुक्ताई ॲकेडमी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन राणी पार्वती देवी शाळेच्या नवरंग सभागृहात करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन मा.श्री.विकासभाईंचे सुपुत्र आणि उदयोजक श्री.विक्रांत सावंत यांच्या हस्ते आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.अमोल सावंत, राणी पार्वती देवी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब नंदीहळ्ळी, मुख्याध्यापिका सौ.संप्रवी कशाळीकर, शांतिनिकेतन शाळेचे मुख्याध्यापक श्री.समीर परब, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
श्री.विक्रांत सावंत यांनी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी मुलांना शुभेच्छा देत मा.श्री.विकासभाईंच्या कार्याविषयी आणि विविध उपक्रमांविषयी माहीती दिली. मुक्ताई ॲकेडमी मुलांसाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक करतानाच यापुढे मुलांसाठी मुक्ताई ॲकेडमीच्या माध्यमातून काही उपक्रम करण्याचे त्यांनी जाहीर केले. सर्व मान्यवरांनी मुलांना शुभेच्छा देत असे उपक्रम वेळोवेळी राबवावेत अशी इच्छा व्यक्त केली. श्री.कौस्तुभ पेडणेकर सरानी ॲकेडमीच्या उपक्रमांची माहीती देत पुढील महिन्यात कॅरम आणि बुदधिबळ जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. श्री.मिनानाथ वारंग सरांनी सूत्रसंचालन केले.

You cannot copy content of this page