⚡सावंतवाडी ता.२१-: भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातुन सावंतवाडी मध्ये आज योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जावा असा ठराव त्यांनी मंजूर करून घेतला व १७२ देशांच्या मान्यतेने तो ठराव मंजूर झाला.प्राचीन व सनातन भारताची योग ही अनमोल ठेव आहे ती जपण्याचे व त्याला आंतराष्ट्रीय दर्जा देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले, असे भारतीय जनता पार्टी चे युवा नेते संदिप गावडे बोलताना म्हणाले.
यावेळी शालेय तसेच विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी या शिबिरामध्ये मोठी उपस्थिती दर्शविली यावेळी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, युवा नेते संदिप गावडे, जिल्हा बँक संचालक रवि माडगावकर,मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, मिसबा शेख, दिलीप भालेकर, सागर ढोकरे, आदि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी योग मार्गदर्शक म्हणून प्रदीप्ती कोटकर तसेच रिया सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.