कणकवली नगरपंचायत व कनकसिंधू शहर स्तर संघ, यांच्यावतीने योग दिन साजरा…

कणकवली : जागतिक योग दिनानिमित्त कणकवली नगरपंचायत, कणकवली व कनकसिंधू शहर स्तर संघ, कणकवली यांच्यावतीने नगरवाचनालय हॉल येथे योग अभ्यास करण्यात आला. “जेथे योग असे, तेथे रोग नसे” हा मंत्र घेत. प्रत्येकाने थोडा वेळ तरी योगा करावा व निरोगी राहावं असा संदेश देत. योग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी योग प्रशिक्षक आनंद सावंत यांनी उपस्थित महिलांना योगासनाचे विविध प्रकार दाखविले. आपल्या दैनंदिन जीवनात शरीराला होणारे फायदे देखील समजून सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, योगप्रशिक्षक आनंद सावंत, कनकसिंधू शहर स्तर संघ अध्यक्ष प्रिया सरूडकर, स्वाती राणे व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page