तालुक्यातील धान्य दुकानदार 1 मे पासुन संपावर

रुपेश राऊळ यांची माहीती, शासनाने मागण्यांना प्रतिसाद न दिल्याने निर्णय

*💫सावंतवाडी दि.२९-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानादेखील राज्यात भूकबळी होऊ नये. यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता धान्य वाटप केले परंतु त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच देण्यात आले नाही. यावेळी मृत झालेल्या रास्त धान्य दुकानदारांना देखील कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देखील देण्यात आली नाही आहे. त्यामुळेच नाईलाजास्तव १ मे पासून राज्यातील सर्व रास्त धान्य दुकानावर धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यामुळे जो पर्यंत शासनाकडून योग्य निर्णय होत नाही तो पर्यंत धान्याचे मागणी पत्र मंजूर करू नये अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार म्हात्रे यांच्याकडे केली आहे. यावेळी संजय मळीक, तनवी परब, लक्षमण ठाकूर, भाककर सावंत, प्रविण गवस, शिवा लाड, रोहिनी गावडे , अनिकेत रेडकर, संतोष देऊगुरो निवेदन देताना उपस्थित होते.

You cannot copy content of this page