नागरिकांनी कोरोना नियम पाळून काळजी घ्यावी-: परशुराम उपरकर
*💫कणकवली दि.२९-:* सध्या राज्यामध्ये रेमडेसिविर आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे शेकडो माणसे मरत असताना राज्याचा सत्ताधारी व विरोधी पक्ष श्रेयासाठी भांडत आहेत. यातून नागरिकांचे जीव वाचवणे व त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येऊन प्रयत्न करण्याऐवजी लसीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा लसीचा तुटवडा व ज्येष्ठांसाठी करिता हेलपाटे मारायला लावत आहेत. या सर्व विषयातून राज्यकर्ते व प्रशासनत काम करणाऱ्या प्रमुखांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे वाढत्या कोविड मुळे मृत्यु संख्या वाढत असल्याने प्रशासकीय नियम पाळून जनतेने स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे. प्रशासन प्रमुख हे अपुरी लस पुरवल्याने, रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठा कमी असल्याने यामध्ये हतबल झालेले आहेत. त्यांच्या रोश स्थानिक जनतेकडून व लोकप्रतिनिधींकडून प्रशासनावर ठेवला जात आहे. आज सर्वच लोकप्रतिनिधी व सिसिसी सेंटर सुरू करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर श्रेयासाठी भांडत आहे. त्या कुठल्या सेंटर मध्ये किती रुग्ण राहिले आणि किती वेळ रिकामे राहिले हे तपासले पाहिजे. आज बहुसंख्य सिसीसी सेंटर मध्ये दाखल होत असलेल्या रुग्णांना डॉक्टर तपासण्या करिता किती वेळ भेट देतात? कारण काही कोविड सेंटर ही निर्जनस्थळी आहेत त्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा योग्य प्रकारच्या मिळत नसल्याने तालुक्यातालुक्यात डीसिसीसेंटर सुरू करण्याची गरज आहे. त्या डीसीसी मध्ये किमान पाच ते दहा बेड ऑक्सिजन सहित असावेत. जेणेकरून जिल्हा रुग्णालयातील ताण कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे कणकवली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आठ ते दहा वेंटिलेटरचा वापर होत नसल्याने ते ओरोस येथे हलविण्यात यावे. तसेच व्हेंटिलेटर अभावी रुग्णांना कोल्हापूर येथे जावे लागते व कोल्हापूर येथे नेण्यासाठी कार्डियाक ॲम्बुलन्स नसल्याने रूग्णांचे हाल होऊन मरण पावतात. तालुक्यातालुक्यात डीसीसी सेंटर सुरू करून जिल्ह्यातला होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने यावर विचार करावा. यामध्ये रॅपिड टेस्ट करायची मशीन गेल्या चार दिवसापासून बंद आहे त्यामुळे ज्यांचे ज्यांचे स्वॅप घेतले आहेत त्यांचे रिपोर्ट येण्यास चार ते पाच दिवस उजाडत आहेत याची दखल घ्यावी. उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयात काही ठिकाणी स्वॅप कलेक्शन व लसीकरण एकाच इमारतीत होत असल्याने लसीकरण कामासाठी आलेले लोक स्वॅब कनेक्शनच्या रांगेत उभे राहतात.त्यामुळे कलेक्शन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. लसीकरणासाठी आलेल्या रुग्णांना लस संपल्याने परत जावे लागते. दि. १ मे नंतर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिक व तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार असल्याने लस मागणी करताना आता लस पुरवठ्याच्या चौपटीने किंवा त्यापेक्षा जास्त मागणी करावी. लसीकरण केंद्रे वाढउन तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारीवर्ग नियुक्त करावा. या सर्व कामांमध्ये प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख आपल्या प्रशासकीय अभ्यासाप्रमाणे लसीकरण आणि कोविड रुग्णांना असलेल्या सुविधांमध्ये नियोजन करण्याचा प्रयत्न करीत असतात. निवडून आलेले लोकप्रतिनिधी शक्य होतं नसणारी आश्वासने देऊन अडचणी निर्माण करत आहेत. मागील कोरूना काळात करत असताना कुडाळ चे 300 बेडचे महिला रुग्णालय सुरू करण्यासाठी दोन ते अडीच कोटी रुपये निधी दिला असता किंवा रस्त्यांचे पैसे लोकांचे जीव वाचवण्यासाठी वापरले असते, त्यामध्ये ऑक्सीजन प्लांट सुरू केले असते तर जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना कोल्हापूर ठिकाणी धावपळ करावी लागली नसती. त्याचबरोबर 300 बेडच्या महिला रुग्णालयाला स्टॉपिंग पॅटर्नप्रमाणे स्टाफ मंजूर करून घेतला असता तर सुसज्ज रुग्णालय कोविड साठी वापरता आले असते. मात्र सदर इमारतीत सात वर्षापूर्वी बांधून पडून होती आता या ठिकाणी तीस बेडच सीसिसी उभे असून तेथे प्राथमिक उपचार होत आहेत. सध्याच्या लोकप्रतिनिधींनी घोषणा केल्याप्रमाणे मेडिकल कॉलेज व मल्टिस्पेशालिटी रुग्णालय होईल तेव्हा होईल परंतु त्यासाठी मंजूर करून घेतला आहे तो स्टाफ या हॉस्पिटल साठी मंजूर करून घ्यावा व सदर रुग्णालय चालू करावे यामध्ये कोणतेही राजकारण न आणता जिल्ह्यातील जनतेसाठी पालकमंत्र्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजूर करून आणावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तरुणांनी आणि 18 वर्षा वरील वरील सर्वांनी लसीकरण करून घेणे घेऊन स्वतःला कोरोणा पासून संरक्षण करा अशा प्रकारचे मनसेकडून आवाहन करण्यात आले आहे.
