⚡आंबोली,ता.१७-: येथील नांगरतास येथे गव्या नी शेतीचे नुकसान सत्र सुरु केले आहे. ऊस, भात शेतीत नुकसान करत आहेत.त्यामुळे शेती करणे मुश्किल झाले आहे.वन विभागाने पाहणी करावी आणि गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तेथील शेतकरी शाहू लांबोर,जानू पटकारे, नाऊ पटकारे आदिनी वन विभागाच्या कार्यालयात येऊन सोमवारी वन क्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्याकडे मागणी केली.
सध्या भात तरवा घालण्याचे काम सुरु असून गवे नुकसान करत असल्याचे त्यांनी वन कार्यालयात सांगितले.मात्र आज सकाळी देखील तेथील शेतकऱ्यांनी वन खात्याच्या कोणीही अधिकारी आणि कर्मचारी येऊन पाहणी केली नसल्याचे सांगितले. गवे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेती करणे अवघड झाल्याचे त्यांनी सांगून प्रशासनाने याकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे.