⚡सावंतवाडी ता.१७-: येथील मिलाग्रीस हायस्कूल या प्रशालेत इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रार्थना गीताने परमेश्वराची आराधना करण्यात आली. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. यानंतर उपस्थित विद्यार्थी व पालक यांना शुभ संदेश देण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार करीत सर्वांचे मनोरंजन केले.
यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग डायोसेशन एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष व विकार जर्नल रे.फादर अँड्रय़ू डिमेलो, तसेच ज्युडिशियल विकार ऑफ डायोसिस ऑफ सिंधुदुर्ग चे रे.फादर मिल्टन मोंतेरो सेंट जोसेफ चर्च भेडशी चे असिस्टंट पॅरिस्ट प्रिस्ट रे.फादर रिचर्ड फर्नांडिस प्रशालेचे मॅनेजर रे.फादर मिलेट डिसोजा यांचे स्वागत मिलाग्रीस हायस्कूल चे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व पालकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरविण्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने आर्या रावजी राणे हिने तर पालकांच्या वतीने सैनिक स्कूल आंबोलीचे उपमुख्याध्यापक व विज्ञान मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष ऋषिकेश गावडे यांनी केले.
संस्थाध्यक्ष रे.फादर अँड्रय़ू डिमेलो यांनी तसेच शाळेचे मॅनेजर रे.फादर मिलेट डिसोजा यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.तर प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करीत त्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी हायस्कूल पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर ,मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी,इंग्लिश प्रायमरी पर्यवेक्षिका क्लीटा परेरा आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा गावडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रोफेसर शेनीला गवंडे यांनी केले.
मिलाग्रीस हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न…!
