वेत्ये ग्रामपंचायतच्या वतीने उत्तीर्ण दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार…

सरपंच गुणाजी गावडे यांचा पुढाकार: उपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा..

⚡सावंतवाडी ता.१६-: वेत्ये ग्रामपंचायतच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सरपंच गुणाजी गावडे यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांकडून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा कौतुक करून कुठल्याही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत हवी असल्यास आपण निश्चितच त्यांना सहकार्य करू असे उपस्थितांकडून यावेळी सांगितले.

दरम्यान कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत तर्फे शाल श्रीफळ तसेच सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून ग्रामपंचायत चे आभार मानले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक ओमप्रकाश तिवरेकर सर,प्रमुख अतिथी महेंद्र अकॅडमी चे संस्थापक महेंद्र पेडणेकर,उपसरपंच महेश गावडे, स्नेहा मिठबावकर, सुनील गावडे,तन्वी गांवकर, राजन आंबेकर ,नंदिनी निगुडकर,
ग्रामसेवक स्वाती कदम,
तंटामुक्ती अध्यक्ष गुरुदास गांवकर,
नरेंद्र मिठबावकर,जितू गांवकर,
बाळू गांवकर,पोलिस पाटील रमेश जाधव, शरद जाधव,संतोष गावडे,
प्रकाश देऊलकर, प्राची राऊळ,
कृषी मॅडम संतोषी गांवकर,
यशिका गावडे, आधी उपस्थित होते

You cannot copy content of this page