⚡मालवण ता.१४-:
मालवण मेढा येथील यश मिलिंद कदम याने नीट (NEET) परीक्षेत भारतभरातून लाखो विद्यार्थ्यांमधून १८२३ वी रँक मिळवीत नेत्रदीपक यश मिळवले आहे.
यश कदम याने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टोपीवाला हायस्कूल मालवण येथे पूर्ण केले. तर उच्च माध्यमिक शिक्षण सांगली येथील क्लिअर कन्सेप्ट अकॅडमी मध्ये झाले असून इयत्ता बारावी मध्ये ८६ टक्के गुण संपादन केले. तर आता नीट परीक्षेतही ५९४ गुण मिळवीत सुयश संपादन केले आहे.या परीक्षेसाठी भारतभरातून लाखो विद्यार्थी प्रविष्ठ होतात त्यात त्याने १८२३ वी रँक प्राप्त केल्याने त्याचे हे यश अधोरेखित झाले आहे
कुमार यश हा मालवणच्या सिद्धेश प्रिंटर्स चे मालक मिलिंद कदम आणि सौ मानसी कदम यांचा मुलगा आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वांकडून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.