⚡मालवण ता.१४-:
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मालवण तालुक्यातील आडवली येथील कुमारी रूपा लाड या अपंग महिलेस व्हीलचेअर भेट देण्यात आली.
45 वर्षीय रूपा लाड या शारीरिक दृष्ट्या 65% अपंग असून त्या आपल्या आई-वडिलांच्या सोबत राहतात . चालता येत नसल्याने उचलून घेऊन आधार देत तिचे दिनक्रम करावे लागत. आई-वडील रुद्ध असल्याने व घरी कोण आणखी व्यक्ती नसल्याने गैरसोय होत होती. याविषयी त्यांनी कुटुंबीयांनी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्याकडे व्हीलचेअर ची मागणी केली होती. राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना ही व्हीलचेअर त्यांच्या घरी जाऊन त्यांना देण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर,जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते. या प्रसंगी कुटुंबीयांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.