वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर..
⚡मालवण ता.१४-:
मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या अतिवृष्टीने पोईप गोळवण कट्टा मुख्य मार्गावरील पोईप धरणानजीक असलेली मोरी (कॉजवे) अवजड वाहनांच्या वाहतुकीने खचून आतील पाईप फुटल्याने या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घेऊन या कॉजवे बाबत उपाययोजना करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी केली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी मालवण बेळणे मार्गावरील विरण येथील पुलाची संरक्षक भिंत कोसळल्याने या पुलावरून अवजड वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे यामुळे मसदे तिठा-गोळवण-पोईप अशी एसटी बस व अवजड वाहनांची वाहतूक चालू करण्यात आली आहे. यामुळे गेल्या कित्येक वर्षांचा हा कॉजवे अवजड वाहनांच्या वाहतुकीने पूर्णतः खचला असून आतील पाईपही फुटले असून डांबरीकरणाला भेगा पडल्या आहेत याबाबत शनिवारी दुपारी या भागाचे लोकप्रतिनिधी तथा माजी जि प बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी या कॉजवेच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी कॉजवे वर पडलेल्या खड्ड्यात जिरे टाकून तात्पुरती उपाययोजना केली आहे परंतु यावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे यामुळे संबंधित बांधकाम विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी कांदळकर यांनी केली आहे. सध्या विरण पुलावरून अवजड वाहतूक बंद असून या कॉजवे वरूनही वाहतूक बंद पडल्यास प्रवासी, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होणार आहे याबाबत बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घेऊन उपाययोजना करावी. हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्यास गोळवण पोईप बरोबरच इतर परिसरातील एसटीच्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.