,⚡मालवण ता.१४-:*
तेली समाज उन्नती मंडळ मालवणच्या ज्ञाती बांधवांची सभा रविवार दि. २२ जून रोजी संत तुकाराम पादुका मंदिर, देऊळवाडा मालवण येथे सायंकाळी ३. ३० वा. आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्व पदाधिकारी, कार्यकारी सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तेली समाज मंडळ मालवणतर्फे करण्यात आले आहे.
तसेच दहावी परीक्षेत ७५ टक्के व बारावी परीक्षेत ७० टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या तसेच पदवी व पदविका मिळविलेल्या मालवण मधील तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका व आधार कार्ड झेरॉक्स प्रत त्यांच्या पालकांनी अशोक ओटवणेकर यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.