शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडावा…

आ दीपक केसरकर:मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे केले जाहीर..

⚡सावंतवाडी ता.०९-: समृद्धी महामार्ग हा ज्याप्रमाणे मालवण बंदराला जोडण्याचा निर्णय झाला आहे त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग हा सुद्धा रेडी बंदराला जोडण्यात यावा आणि तशा प्रकारे फेरसर्वे करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

तर दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा प्रश्न लक्षात घेता आपण कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांची हकालपट्टी करण्याची मागणी वनमंत्र्यांकडे करणार असल्याचेही आमदार केसरकर म्हणाले.
आमदार श्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संजू परब दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस आधी उपस्थित होते. आमदारकीसरकर म्हणाले, अवकाळी पावसाने अलीकडेच मोठ्या प्रमाणात विजेचा प्रश्न सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्माण झाला होता त्यामुळे यावर तोडगा करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यामध्ये किनारपट्टी भागामध्ये येणारी वादळी लक्षात घेता त्या ठिकाणी अंडरग्राउंड वीज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा किनारपट्टी भागाला होणार आहे त्याचप्रमाणे सावंतवाडी इन्सुली ते सासोली, वेंगुर्ला ते मळेवाडी या ठिकाणी सुद्धा अंडरग्राउंड केबल टाकण्याची गरज आहे त्या संदर्भात आपण वीस वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्याशी चर्चा केली असून ते त्या संदर्भातील प्रस्ताव आपल्याला सादर करणार आहे हा प्रस्ताव घेऊन आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून अंडरग्राउंड केबल साठी आपण मागणी करणार आहे दुसरीकडे सावंतवाडी शहर आणि कणकवली शहरातही अंडरग्राउंड संदर्भात विचार केला जाणार आहे तशाप्रकारे आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा करणार आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा शक्तिपीठ महामार्ग हा थेट गोव्याला जोडणार आहे परंतु तो थेट गोव्याला जोडता समृद्धी महामार्ग ज्याप्रमाणे मालवण बंदराला जोडला गेला जाणार आहे त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग हा रेडी बंदराला जोडला जावा त्यासाठी पुन्हा सर्वेक्षण व्हावे अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असून तसा निर्णय झाल्यास पर्यटन दृष्ट्या जिल्ह्या त क्रांती घडणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा गेले पासून अडवेपर्यंत भुयारी असणार आहे त्यामुळे जंगल नष्ट प्रश्नच येणार नाही असेही ते म्हणाले. सावंतवाडी तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्न बाबतही आपण सकारात्मक असून लवकरच आपण जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहे तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये फिजिशियन मिळावा यासाठी आपली आग्रही मागणी आरोग्यमंत्र्यांकडे राहणार आहे ज्याप्रमाणे या ठिकाणी डायलिसिसची सुविधा देण्यात आली आहे तसेच सुविधा लवकरच वेंगुर्ला आणि दोडामार्ग येथेही सुरू करण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या डॉक्टरांना अतिरिक्त वेतन सीएसआर फंडातून देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचीही भेट घेतली आहे.तर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात राजघराण्याकडून सही झाल्यानंतर कामास सुरुवात होईल.
श्री केसरकर पुढे म्हणाले, दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्य वनसंरक्षक रामानुजन हे निष्क्रिय असल्यानेच हा प्रश्न अधिक वाढला आहे त्यामुळे त्यांची येथून तात्काळ हाकलपट्टी व्हावी अशी मागणी आपण वनमंत्र्यांकडे करणार आहे या ठिकाणी हत्तींबरोबरच वन्य प्राण्यांचा प्रश्न वाढत असताना त्यावर आळा आणण्यापेक्षा येथील कातव्यवसायिक तसेच अन्य व्यावसायिकांना त्रास देण्याच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी आपण करणार आहोत. तर जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती आधी आगामी काळात होणाऱ्या निवडणुका या युतीच्या माध्यमातून एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे असे ते म्हणाले शिवाय राज्यात सत्ता महायुतीची असल्याने या ठिकाणी होणारी विकास कामांची भूमिपूजने ही युतीच्याच माध्यमातून व्हावी अशी आपली भावना आहे जे कोणी यामध्ये खोड करतात त्यांची हकालपट्टी भविष्यात लोकच करतील याआधी सुद्धा अशा प्रकारे वागणाऱ्यांना लोकांनी घरी बसवले आहे.

You cannot copy content of this page