सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना पितृशोक…

वेंगुर्ले : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांचे वडिल होडावडा सोसायटीचे माजी चेअरमन, आंबा बागायतदार, पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. प्रकाश सेनापती दळवी वय ७५ यांचे शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बांबुळी गोवा येथे उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे सुना, नातवंडे, एक विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे. राजकारणात आणि समाजकारणात त्यांचा सहभाग होता.

You cannot copy content of this page