वाफोली गणपती मंदिर रस्तावरील खड्डे तात्काळ बुजवा…

प्रशांत बांदेकर यांची मागणी: सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर..

⚡बांदा ता.०७-: बांदा-दाणोली रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून बांदा शहरातील काम हे पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. मात्र या रस्त्यावरील वाफोली गणपती मंदिर पर्यंतचा रस्ता हा जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे हे तात्काळ बुजवावेत अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. उपअभियंता श्री लोहार यांनी येत्या आठ दिवसात या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या आश्वासन दिल्याची माहिती श्री बांदेकर यांनी दिली.
या संदर्भात श्री बांदेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की बांदा दाणोली रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हे प्रगतीपथावर आहे. बांदा शहरातील काम हे पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. मात्र या मार्गावर भले मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या ठिकाणी दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील खड्डे हे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात यावेत.
आठ दिवसांनी शाळा सुरू होणार असल्याने अनेक शालेय विद्यार्थी या रस्त्यावरून पायी प्रवास करत असतात. रस्ता खराब झाल्याने याचा फटका वाहन चालकांबरोबरच विद्यार्थ्यांना देखील बसणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करावी.
उपअभियंता श्री लोहार यांनी पावसाळ्यात या रस्त्यावर अपघात होऊ नये यासाठी येत्या आठ दिवसात खड्डे बुजवण्याचे आश्वासन बांदेकर यांना दिले.

You cannot copy content of this page