अवैध धंदे लॉबी पोलिसाना जुमानत नाही !

पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसेने वेधले लक्ष :सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मनसे शिष्टमंडळाला अधीक्षकांची ग्वाही..

⚡कुडाळ ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नव्याने रुजू झालेले डाॅ. मोहन दहिकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर बंद झालेले अवैध धंदे पुन्हा सुरु झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईला सुद्धा ती लॉबी जुमानत नाही, याकडे मनसे शिष्टमंडळाने नूतन पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले.
मनसेचे जिल्हा अध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने नूतन पोलीस अधीक्षक डॉ. मनं दहीकर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाने पूर्णपणे बंद झालेले मटका व दारू धंदे पुन्हा जोमाने चालू झाल्याचे नवीन पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पोलीस कारवाई करतात पण हि लाॅबी पोलिसांना जुमानत नाही. यावर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी अमली पदार्थांची तस्करी यावर कायमचा बंदोबस्त घालण्यासाठी विशेष पथक नेमून कारवाई करावी, प्रार्थना स्थळावरील भोंगे बंद करावे, अशा मागण्या ,चर्चा मनसेतर्फे करण्यात आल्या . आपली कारकीर्द लक्षात रहावी, लोकाभुमिक, आणि नि:ष्पक्षपाती राहावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या. .
हे सर्व विषय गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी सूचना आणि मदत करण्याचे आवाहन केले.या वेळेस जिल्हाध्यक्ष धीरज परब, अनिल केसरकर, उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, गणेश वाईरकर, हेमंत जाधव ,सुरज पुजारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page