⚡बांदा ता.२९-: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सावंतवाडी येथे शनिवार दिनांक ३१ रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी ४ वाजता राजवाडा हॉल येथे संपन्न होणाऱ्या या मेळाव्याला पालकमंत्री नितेश राणे, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सरचिटणीस महेश सारंग, प्रसन्ना देसाई, जिल्हा संयोजक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोहच्या प्रमुख वक्त्या डॉ. ज्योती तोरसकर आदी मान्यवर उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. महिलांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांनी केले आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सावंतवाडीत ३१ रोजी महिला मेळाव्याचे आयोजन…
