उबाठा युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत केला प्रवेश…

मालवण दि प्रतिनिधी
मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी मतदार संघात सुरु केलेल्या विकास कामांच्या धडाक्याने प्रेरित होऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी देवली येथील उबाठा युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. अलीकडच्या काळात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघात उबाठा शिवसेनेला धक्यावर धक्के देण्यास सुरुवात केली असून आज पुन्हा एकदा देवली गावात उबाठा शिवसेनेला धक्का दिला आहे.

शिवसेनेत प्रवेशकर्त्यात राहुल चव्हाण, प्रकाश चव्हाण, वेदिका चव्हाण, उमेश चव्हाण, प्रतिक देऊलकर, शशिकांत चव्हाण यांचा समावेश आहे. यावेळी माजी नगरसेवक दीपक देवली यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page