कणकवली : भारत देशासाठी आणि भारत देशाच्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी १२ मे रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या तिरंगा यात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे करणार आहेत. या तिरंगा यात्रेत कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिक्षक, रोटरी सदस्य, डॉक्टर, वकील, शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सदरची यात्रा ही सकाळी ८.०० वाजता कणकवली शहरातील पटकीदेवी मार्गे तहसीलदार कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
