⚡सावंतवाडी ता.०६-: मिलाग्रीस ज्युनियर कॉलेज ने जाहीर झालेल्या निकालानुसार यावर्षीही शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे.
विज्ञान शाखा
कुमार. राम प्रकाश फाले याने ७९.८३% गुण प्राप्त करत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला कुमार. धोंडी रोहिदास सावंत याने ७९.६७% द्वितीय क्रमांक प्राप्त केला
तसेच कुमारी. मेगन मायकल माडतीस हिने ७०.६७% तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य शाखा
वाणिज्य शाखेत कुमारी जेफी ज्युलियन फर्नांडिस हिने ७८.३३% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कुमारी. अलीना गुलजार शेख हिने ७३.६७% गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.कुमारी. अँड्रिया जुझे डिसोझा हिने ७२.५०% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
जिल्ह्यामध्ये सलग 100 वर्षाची यशाची परंपरा अखंडित राखण्यात मिलाग्रीस जूनियर कॉलेज यांनी पुन्हा एकदा शंभर टक्के यश मिळवले याप्रसंगी मिलाग्रीस जुनियर कॉलेजचे प्राचार्य फादर रिचर्ड सालदाना व पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर टीचर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले .
