⚡बांदा ता.०७-: बांदा लकरकोट येथे श्री दत्त महाराजांच्या नुतन मूर्तीचे नामस्मरणाच्या गजरात मंगलमय मिरवणुकीने सोमवारी आगमन झाले.
लकरकोट श्री दत्त मंदिर पुर्नप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा सोमवार ते गुरूवार सरू आहे. त्यानिमित्त सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
सोमवारी बांदा कट्टाकॉर्नर येथुन या मिरवणुकीला आरंभ झाला. श्री बांदेश्वर मंदिर मार्गे ही मिरवणूक लकरकोट येथे आली. श्री गणपती, श्री दत्तगुरु तसेच शिखरकलश हे सजविलेल्या रथात ठेवण्यात आले.त्यापुढे श्री दत्तनामाचा गजर व भजन करीत भाविक चालले होते. मंगल कलश घेऊन पारंपरिक वेशभूषा करून महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मिरवणूक मंदिरात पोहोचताच वंदन करून मुर्ती व शिखरकलश धान्याधिवासात ठेवण्यात आले. मंगळवारी विविध धार्मिक विधी करून मुर्ती व कलश जलाधिवासात ठेवण्यात आले. बुधवारी कलशारोहण सोहळा तर गुरूवारी मुर्ती स्थापना होणार आहे.
बांद्यात श्री दत्तगुरू मुर्ती व शिखरकलशाचे मिरवणुकीने आगमन…
