आ केसरकर यांच्या माध्यमातून मंडळाची वास्तू उपलब्ध केल्याने गावडे यांचा केला सत्कार..
आंबोली: 4 मे 2025
SDF मित्र मंडळ आंबोली यांची 4 मे रोजी वार्षिक श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न झाली. या पूजेला आंबोली- चौकुळ जिल्हा परिषद मतदार संघाचे जनतेच्या मनातील उमेदवार, युवा नेते श्री दिनेश शिवाजी गावडे यांनी भेट दिली. मंडळाच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्यात. सावंतवाडी मतदार संघाचे आमदार श्री. दीपक भाई केसरकर व श्री. दिनेश गावडे यांच्या सहकार्यातून आंबोली फौजदारवाडी येथे मंडळाच्या वास्तूसाठी सर्वतोपरी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली व भव्य अशी वास्तु निर्माण करण्यात आली आहे. यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिनेशभाई यांचे आभार मानले.
SDF मंडळाकडून या दिवशी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्यात. यामध्ये तेजस परब, मृणाली गावडे, कार्तिक गावडे हे विविध खेळात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. महिलांसाठी खेळ पैठणीचा या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सौ. सुचिता सावंत ( कारिवडे) या पैठणीच्या मानकरी ठरल्यात. श्रीसत्यनारायण कथा सांगणे या स्पर्धेत लहानांपासून थोरांपर्यंत बऱ्याच जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात स्वस्तिक गावडे प्रथम व निकिता राऊत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या सर्वांना मंडळाकडून पारितोषिके देण्यात आलीत. रात्री आंबोली सांप्रदायिक मंडळाच्या वतीने भजन करण्यात आले.
