दीपक केसरकर यांनी राजकीय निवृत्ती घेण्यापूर्वी मतदारांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा…

रामचंद्र सावंत:केसरकर यांनी एका एकी राजकीय निवृत्ती घेऊ नये..

⚡दोडामार्ग,ता-०६:- माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच राजकीय निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली आहे, हा निर्णय केसरकर यांनी घेण्यापूर्वी मतदारांना विश्वासात घेऊनच या निर्णयाची घाई करावी असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा तळकट माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी बोलताना व्यक्त केले,

सावंतवाडी मतदारसंघातील जनतेने चौथ्यांदा आमदारकी बहाल करून जनतेने विश्वास दाखविलेला आहे, केसरकर हे सर्वसामान्यातील नेतृत्व तसेच एक अभ्यासू व्यक्ती आहेत, त्यांना सर्वच समाजातील लोकांची जाण आहे वेळोवेळी अडलेल्या नडलेल्याना मदत करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे, त्यामुळे आपला हक्काचा माणूस आणि गोर गरिबांचा पाठीराखा म्हणून त्यांची ओळख आहे,
शिवाय पक्षामध्ये आपल्या पक्षाची खंबीरपणे बाजू मांडताना केसरकर तसूभरही ढळले नाहीत. त्यांच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम पसरला होता मात्र केसरकर हे आपल्या तत्त्वाशी एकनिष्ठ होते, त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भक्कमपणे बाजू मांडल्यानेच पक्षाला भक्कम ताकद मिळाली,
पक्षाच्या आणीबाणीच्या काळात दीपक केसरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पक्षाचे प्रवक्ते पद सांभाळत पक्षाला नवी दिशा दिली,तसेच विरोधकांच्या टीकांना देखील त्याच पद्धतीने प्रति उत्तर देत शिंदे शिवसेनेचा भगवा त्यांनी फडकवला, त्यामुळे पक्षाच्या आणीबाणीच्या काळात पक्षाचे प्रवक्ते पद सांभाळत सावंतवाडी मतदार संघाच्या आपल्या दीपक केसरकर यांनी नेतृत्व केले असे प्रत्येक मतदार अभिमानाने सांगतो, सावंतवाडी मतदार संघाने केसरकर यांच्या वर विश्वास दाखवत चौथ्यांदा आमदार की ची जबाबदारी बघाल केल्या मुळे केसरकर यांनी अशी एका एकी राजकीय निवृत्ती घेऊ नये ,त्यांनी मतदारांना विश्वासात घ्यावे असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा तळकट माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी बोलताना सांगितले आहे.

You cannot copy content of this page