आंबोली धबधबा येथे तेलंगना च्या पर्यटकांना मारहाण…

आंबोली,ता.५: आंबोली घाटातील स्टॉल धारकाने पाचशे पाच रुपये बिलापैकी 5 रुपयावरून तेलंगणा येथील पर्यटकांना मारहाण केल्याने त्यातील एकाच्या डोक्यावर पाण्याचा जग मारल्याने गंभीर जखमी झाला.यात चौघांना मारहाण करण्यात आली. यानंतर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्या नंतर येथील डॉ.महेश जाधव व आदिती पाटकर यांनी उपचार केल्या नंतर सावंतवाडी येथे १०८ ने पाठवण्यात आले.या नंतर पोलीस हवालदार मनीष शिंदे अभिजित कांबळे यांनी जबाब नोंद करून पुढील तपास करीत आहेत

You cannot copy content of this page