विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हावे…

अद्वैत सामंत:सरंबळ हायस्कुल मध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा:सलग 11 व्या वर्षी यशस्वी आयोजन..

⚡कुडाळ ता.०५-: विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडावे हाच यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग असल्याचे जीवनविद्या मिशनचे प्रसारक अद्वैत सामंत यांनी म्हटले. सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ येथे गुरूदक्षिणा सभागृहात संपन्न झालेल्या 11 व्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात करिअर मार्गदर्शन विषयावर ते बोलत होते. माजी विद्यार्थी मंडळाकडून सलग ११ व्या वर्षी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनाने शाळा पुन्हा गजबजली.
माजी विद्यार्थी डी.के.परब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 11 व्या माजी विद्यार्थी मेळाव्यास जीवनविद्या मिशनचे प्रसारक अव्दैत सामंत व सेवानिवृत्त सहाय्यक गुप्तवार्ता पोलिस आयुक्त तथा जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र कुडाळचे अध्यक्ष मधुकर सावंत, सरंबळ ग्रामस्थ समता संघाचे सचिव राजेंद्र परब, रविंद्र परब, सरपंच रावजी कदम, उपसरपंच सागर परब, माजी मुख्याध्यापक विवेकानंद बालम, विद्यमान मुख्याध्यापक अनिल होळकर , माजी विद्यार्थी मंडळाचे नूतन अध्यक्ष सचिन मदने, स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष जयप्रकाश गावडे, माजी विद्यार्थी संदिप परब, महिपाल धुरी, वैष्णवी लाड, गुरूनाथ देसाई , आशिष हळदणकर, रोशन कदम, प्रसाद साटम, संतोष राणे, प्रताप गोसावी, समीर कदम, अरविंद परब, सुरेश परब, सुशिलकुमार कदम, संतप्रसाद पाटकर, ज्योती जावकर, शांती सावंत, मनिषा हळदणकर, कनक कुडतरकर, विलास गोसावी, जयेंद्र तळेकर, शिक्षकवृंद किशोर चव्हाण, जाधव सर, चौधरी सर , होळकर मॅडम, शिरसाट मॅडम आदी उपस्थित होते.
या 11 व्या स्नेहमेळाव्याचे Live प्रक्षेपण कोकणसुपुत्र 07 या प्रथमेश परब याच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात आले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, कुवेत ,ओमान, कतार , मुंबई,पुणे , नाशिक, बेंगलोर आदी ठिकाणावरील माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात ऑनलाईनने सहभागी झाले.
सद्यस्थितीत माध्यमिक शाळांबाबतचे शासनाचे धोरण पाहता माजी विद्यार्थ्यांमुळेच शाळेचे अस्तित्व टिकून राहणार आहे असे प्रतिपादन माजी मुख्याध्यपक विवेकानंद बालम यांनी केले.
माजी विद्यार्थी मंडळाचे 11 वे नूतन अध्यक्ष पदी सचिन मदने यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी संदिप परब यांची निवड करण्यात आली.
मुंबईचे सेवानिवृत्त पोलिस गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र कुडाळचे अध्यक्ष मधुकर सावंत यांना अलिकडेच देश सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले. याबद्दल स्नेहमेळाव्यात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्नेहमेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे विविध फनीगेम्स घेण्यात आले. शालेय जीवनातील आठवणींचा गप्पांगण चर्चासत्रात माजी विद्यार्थ्यांनी उत्फूर्त सहभाग घेत बालपणीचा आनंद घेतला.काही माजी विद्यार्थी दहावीचे वर्गखोली शोधत होते, तर काही विद्यार्थी खेळाचे मैदान पाहण्यात दंग झालेले. 1972 -76 सालातील काही ज्येष्ठ माजी विद्यार्थी शालेय आठवणींना उजाळा देत भावूक होताना दिसले.
शाळेतील विद्यार्थ्यांना वाॅटर फिल्टर, पाण्याच्या टाकीची व्यवस्था, सभागृह खुर्च्या, गरजू मूलींना सायकल वाटप, हेल्मेट वाटप, चष्मा वाटप, ज्येष्ठ विद्यार्थी व माजी सैनिक सत्कार, गावातील उद्योजक व विविध स्तरावरील यशस्वी विद्यार्थी सत्कार, मॅरेथाॅन, सायकलिंग , रक्तदान शिबीर, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, ग्रीन बोर्ड, विद्यार्थी स्कूल व्हॅन , कपाट, शैक्षणिक साहित्य, प्राणी , पक्षी पर्यावरणावर आधारित मार्गदर्शन , असे विविध उपक्रम गेल्या 10 वर्षात माजी विद्यार्थी मंडळाकडून यशस्वी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदिप परब , सूत्रसंचालन सौ वैष्णवी लाड, आभार सौ कनक कुडतरकर यांनी केले.

You cannot copy content of this page