सोनुर्लीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद…

नवयुवक कला क्रीडा मंडळ जाधववाडीचे आयोजन…

सावंतवाडी
नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली जाधववाडी याच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात एकूण 16 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर आय केअर सावंतवाडी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा शिबीरात 45 जणांनी नेत्रचिकित्सा करुन घेतली.
सोनुर्ली जाधववाडी येथील नवयुवक मंडळाने यावर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून समजले हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण तेरसे, सहाय्यक शिक्षक प्रदीप सावंत हे लाभले होते तर मान्यवर म्हणून सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, ग्रामसेवक सौ. तन्वी गवस, पोलीस पाटील संदीप मोगम, सामाजिक कार्यकर्ते नागेश गावकर, माजी पोलीस पाटील रामा जाधव, आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जीवनावर प्रश्न मंजुषा दोन गटात घेण्यात आली होती यामध्ये पहिली ते चौथी छोटा गट प्रथम विघ्नेश भिवा जाधव, द्वितीय क्रमांक शशांक विजय गावकर, तृतीय क्रमांक यश नागेश गावकर, पाचवी ते बारावी मोठा गट प्रथम क्रमांक चैतन्य
मिलिंद गावकर, द्वितिय् क्रमांक विभागुण वेदिका विजय जाधव व श्रेया गावकर, तृतीय क्रमांक सिद्धी सुवर्ण साळगावकर, समूहगीत गायन स्पर्धत एकूण एकूण 11 संघ सहभागी झाले होते यामध्ये प्रथम क्रमांक प्रज्ञासूर्य समूह गट आसोली, द्वितीय क्रमांक उत्कर्ष महिला मंडळ आडेली, तृतीय क्रमांक सिद्धार्थ नगर समूह गट नेमळे यांनी पटकवली आहेत. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षी वितरण करण्यात आले.

You cannot copy content of this page