संजू परब: दीपक केसरकर यांनी मांडलेली शक्तिपीठ महामार्गाच्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा; तर काही लोकांची दोन टक्क्यांसाठी धडपड..
⚡सावंतवाडी ता.०३-: ज्यांच आयुष्य लाकूड तोडण्यात गेले त्यांनी पर्यावरणावर बोलू नये, दीपक केसरकर यांनी केलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूमिकेबाबत आमचा पूर्ण पाठिंबा आहे अशी स्पष्ट भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे स्पष्ट केली.
दरम्यान या शक्तीपीठ महामार्गामुळे इथल्या भागाचा विकास देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना देखील विचार करून जर त्यांच्या काही समस्या असतील तर आम्ही ते सविस्तर बसून ते देखील प्रश्न मिटवू असे परब यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांकडून होत असलेल्या विरोधाला शेतकऱ्यांनी न लक्ष देता त्यांची ती धडपड फक्त दोन टक्के मिळण्याकरिता सुरू असल्याची देखील त्यांनी टीका यावेळी केली.
यावेळी तालुका प्रमुख बबन राणे, महेश सावंत, गुरु सावंत, आदी उपस्थित होते.
परब पुढे म्हणाले, ज्या शेतकरी,जमीनधारकांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे त्यांच्या मागण्या देखील समजून घेऊन सोडवल्या जातील. या महामार्गात जमिनी जाणाऱ्यांना मोबदला देखील मिळवून दिला जाईल. शक्तीपीठ महामार्गाला जे विरोध करत आहेत.त्यांचा धंदा लाकूडतोडीचा. असे लोक आता पर्यावरण वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत. ज्यांचे आयुष्य वर्षानुवर्षे जंगले तोडण्यात गेली आणि ज्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास केला असेच लोक आता शक्तीपीठला विरोध करीत आहेत. असा टोला देखील संजू परब यांनी विरोधकांना लगावला.
