पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने पंतप्रधानांकडे मागणी:तहसीलदारांना निवेदन देत केली मागणी..

कणकवली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधून कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पंतप्रधानाना देण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, जन्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवा‌द्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन तीव्र निषेध करत आहे. हा हल्ला करणाऱ्या दहशतवा‌द्यांना त्वरित शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करत दहशतवाद्यांवर जरब बसवली पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाने आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे, असेही म्हटले आहे.

हे निवेदन देताना संघटनेच्या अध्यक्षा सिमरन तांबे, सचिव प्रियांका तावडे, सदस्य माधुरी परब, साक्षी सावंत, वैशाली गुरव, मेघना पांचाळ, सुनीता पवार, गार्गी नेमळेकर आदी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page