कणकवली : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने अभय राणे मित्रमंडळातर्फे उद्यापासून (ता. १ मे ) ते ३ मे २०२५ या कालावधीत कणकवली टेंबवाडी येथे राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय पुरुष गटासाठी अनुक्रमे ५५ हजार ५५५ रु., ३० हजार ५५ रु., ६ हजार ५५५ रु, ६ हजार ५५५ रु. व चषक अशी बक्षीसे आहेत. याशिवाय अष्टपैलू खेळाडू ५ हजार ५५५ रु. व चषक, उत्कृष्ट चढाई ३ हजार ५५ रु. व चषक, उत्कृष्ट पकड ३ हजार ५५ रु. व चषक अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षीसे आहेत.
राज्यस्तरीय महिला स्पर्धेकरिता अनुक्रमे १० हजार ५५५ रु., ६ हजार ५५५ रु., १ हजार ५५५ रु., १ हजार ५५५ रु. व चषक अशी बक्षीसे आहेत. याशिवाय अष्टपैलू खेळाडू १ हजार ५५ रु. व चषक, उत्कृष्ट चढाई ७५५ रु., उत्कृष्ट ७५५ रु. अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षीस आहेत. प्रत्येक सामन्यातील सामनावीराला आकर्षक चषक दिले जाणार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ललित राणे, औदुंबर राणे, अमिता राणे, संदेश आईकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
दरम्यान, मित्रमंडळाकडून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तयारी सुरू असून प्रेक्षक कबड्डीचे सामने बसून पाहता यावे, यासाठी प्रेक्षक गॅलरी देखील उभारण्यात आली आहे.
