शिवसेना म्हणजे सामाजिक कामात अग्रेसर असणारी संघटना…

आमदार दीपक केसरकर:महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून श्री. केसरकर यांच्या हस्ते १३ रूग्णवाहीका प्रदान..

सावंतवाडी : मला निवडून आणण्यासाठी सावंतवाडी सोडली असं मित्रपक्षाच म्हणणं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मतदारसंघात येऊन मला निवडून आणणार असं सांगितलं होतं. ही माझ्यावर असलेली ईश्वरी कृपा आहे. त्याच्या कृपेनं मला पुनर्जीवन मिळालं असून ते मी जनतेसाठी समर्पित करत आहे असं विधान माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी केलं. विधानसभा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून श्री. केसरकर यांच्या हस्ते १३ रूग्णवाहीका प्रदान करण्यात आल्या. बॅ. नाथ पै सभागृहात हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

श्री. केसरकर म्हणाले,राजकारण हे लोकांसाठी असतं, ते स्वतःसाठी नसतं. मत मिळावी म्हणून चार ऍम्ब्युलन्स आणून चार हजार लोक गोळा करणारी लोकं आम्ही बघितलीत. मात्र, आम्ही याआधी ९ रूग्णवाहीका दिल्या होत्या. ८० टक्के समाजकारण हा विचार शिवसेनेचा आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून गावागावात रुग्णवाहिका पोहचल्या होत्या. शिवसेना म्हणजे सामाजिक कामात अग्रेसर असणारी संघटना आहे. काहीजण टीका करतात. पण, माझ्या एका फोनवर १३ ऍम्ब्युलन्स व हर्ष व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे. येथील रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी यासाठी माझा प्रयत्न आहे. राजकारण हे निवडणूकांपूरत असतं. पदाला चिकटून रहाणारा मी नाही. यापुढे निवडणूक लढण्याची इच्छा नाही. काही दिवसांपूर्वी मला पूनर्जीवन मिळालं. हे जीवन मी जनतेसाठी समर्पित करत आहे असं मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच रूग्णवाहिका दिल्याबद्दल अंबर तिंबलो यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी आम. केसरकर यांच्याहस्ते युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, अभिनव फाउंडेशन,गावतळवाडी विकास मंडळ रेडी, गावठणवाडी कलाक्रिडा मंडळ ओटवणे, मलबार नेचर क्लब आंबोली, स्वराज्य मंडळ कलंबिस्त, श्री साईबाबा प्रतिष्ठान आजगाव, साटम महाराज मंडळ निरवडे, मातोश्री मंडळ वेंगुर्ला, कोकण गर्जना वेंगुर्ला, ग्रामविकास वेंगुर्ला, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोडामार्ग, महामाया नवरात्रोत्सव मंडळ पिकुळे, बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळ सावंतवाडी आदींना या रूग्णवाहिका सुपुर्द करण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत-कविटकर, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, प्रेमानंद देसाई, विद्याधर परब, देव्या सुर्याजी, गजानन नाटेकर, परिक्षीत मांजरेकर, हर्षद डेरे, विनोद सावंत, प्रतिक बांदेकर, दिपाली सावंत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page