संजू परब:खुर्चीवर बसून राजकारण करणारे आम्ही नाही..
⚡सावंतवाडी ता.०१-: जनतेची काळजी घेणारा आमदार म्हणजे दीपक केसरकर आहेत. यापूर्वी दहा रूग्णवाहीका मतदारसंघात दिल्या होत्या. आज आणखीन १३ रूग्णवाहीका देण्यात येत आहे. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी आज येथे केले. दरम्यान सिंधुरत्न योजनेतून शेतकरी, महीला बचतगट, दशावतार कलावंतांना भरघोस मदत केली आहे. मात्र, कधीही श्रेयवाद त्यांनी केला नाही. अडीच हजार कोटीची काम दीपक केसरकर यांनी मतदारसंघात केलीत. आज ग्रामीण भागात जाऊन आम्ही काम करत आहोत. खुर्चीवर बसून राजकारण करणारे आम्ही नाही असं विधान श्री. परब यांनी केल. .
