जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद ३० रोजी सिंधुदुर्गनगरीत…

पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती:
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती..

ओरोस ता २८
जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५ यांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते याचे उद्घाटन होणार असून उद्योग उभारून गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींशी सामंजस्य करार यावेळी करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी पाटील यांनी आपल्या दालनात घेतलेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी, राज्यातील उत्पादने यांची निर्यातवृध्दी तसेच औद्योगिक विकासाकरीता गतवर्षी फेब्रुवारी-मार्च, २०२४ दरम्यान जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली. सर्व जिल्हयांतील परिषदांमध्ये २६५२ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होऊन २६ हजार ६८० कोटी रुपयांची गुंतवणुक प्रस्तावित झाली होती. तसेच यामुळे २ लाख ३१ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याचे दिसून आले आहे, असे सांगितले.

You cannot copy content of this page