मधाचे गाव आंबोली ब्रॅण्ड तयार करा -राठोड…

⚡आंबोली,ता.२८-: मधाचे गाव आंबोली घोषित करण्यात आले आहे. इथल्या उत्पादनाचा ब्रॅण्ड तयार करा सह्याद्री मधील सर्वात औषधियुक्त मध म्हणून आंबोली ब्रॅण्ड ला अधिक किमत मिळेल असे प्रतिपादन उमेद चे व्यवस्थापक गणेश राठोड यांनी आंबोली येथे केले. मधाचे गाव आंबोली येथे चांदा ते बांदा मधून जिल्हा नियोजन समिती व खादी ग्रामोदयोग मंडळं यांच्या विद्यमानानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी,डी डी कुरुंदवाडे,लेखापाल टी डी गावडे,जेष्ठ सहाय्य्क बी एम धनवडे,मधुक्षेत्रिक एस.व्ही चाटे,उमेद चे गणेश राठोड,श्री गावडे,रोहिणी गुरव,वनिता गावडे तसे लाभार्थी महिला उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी मध उत्पन्न संदर्भात माहिती दिली.तसेच मध उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.आंबोली चौकुळ येथे ७६ लाभार्थ्यांना २५० पेट्यांचे वितरण करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page