संचमान्यते विरोधात २ मे रोजी माध्यमिक शिक्षकांचा एल्गार…

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा:जी ए सामंत यांची माहिती..

ओरोस ता २५
नवीन शिक्षक संचमान्यता अध्यादेशाचे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाचे कमरडे मोडणार आहे. जिल्ह्यातील १९८ पैकी ९१ शाळा शून्य शिक्षकी होणार असून ६० शाळा एक शिक्षकी होणार आहेत. तर केवळ ४७ शाळांमध्ये पुरेसे शिक्षक राहणार आहेत. याशिवाय ७०० कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे हा आदेश रद्द करण्यासाठी २ मे रोजी संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक – विद्यार्थी यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक समन्वय समितीने आयोजित केला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था अध्यक्ष जी ए सामंत यांनी दिली आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृहात पत्रकार परिषद घेवून ही माहिती देण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष वामन तर्फे, मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष दिनेश म्हाडगुत, शिक्षक भारती सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रशांत आडेलकर, माध्यमिक अध्यापक संघ अजय शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब संघटना सचिव अभिजीत जाधव, कास्ट्राईब कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष संदीप कदम, शिक्षक भारती सिंधुदुर्ग कार्यवाह संजय वेतुरेकर यांसह हरिश्चंद्र मांजरेकर, चंद्रकांत चव्हाण, रत्नाकर सरवणकर, राजेंद्र राठोड, हनुमंत वाळके, संदीप कदम, संजय पेंडुरकर, नारायण कोठावळे आदी इतर संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page