मालवण धुरीवाडा येथे उद्या स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव

⚡मालवण ता.२५-:
मालवण-धुरीवाडा येथील स्वामी समर्थ सदन येथे स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव शनिवार दि. २६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त शुक्रवार, दि. २५ रोजी सकाळी ७ ते शनिवार २६ रोजी सकाळी ७ पर्यंत अहोरात्र अखंड नामस्मरण होणार आहे. सकाळी ७.३० ते ९ पर्यंत काकड आरती, भुपाळ्या, अल्पोपहार, चहापान, सांप्रदायिक अभिषेक, पूजन होणार आहे. ९.३० वाजता चरित्र सारामृत ग्रंथाची सामूहिक पारायणे, दुपारी १२ ते १ पर्यंत महाआरती होतील. दुपारी १ पासून महाप्रसादाला प्रारंभ होईल. त्यानंतर येथील ‘त्रिमूर्ती भक्तिसंगम’ यांचे भक्ती गीतगायन, सद्‌गुरू हिराताई आंबिये यांचे पट्टशिष्य नामदेव महाराज करंगुटकर यांचे कीर्तन होईल. त्यानंतर भवानी देवी भजन मंडळ, भोगवेचे भजन सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी व रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन स्वामी समर्थ सेवेकरी, धामापूरकर कुटुंबीय यांनी केले आहे.

You cannot copy content of this page