विविध उपक्रमांचा शुभारंभ:माजी विद्यार्थी ए टी राणे यांच्याकडून महाविद्यलयाला दीड लाखाची देणगी..
कुडाळ : जागतिक पुस्तक दिन संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रंथालयाच्या स्मार्ट टी.व्ही. नोटीस बोर्डचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इंग्रजी विभागातील स्मार्ट अँड्रॉइड टी.व्ही .चे देखील उद्घाटन सौ. राणे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यलायच्या वर्गखोली विकासासाठी अजित राणे यांनी दीड लाख रुपयांची देणगी प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्याकडे सुपूर्द केली.
युनोस्कोने जाहीर केल्यानुसार १९९५ पासून २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन सर्वत्र साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच ग्रंथज्ञान वृद्धिंगत व्हावे आदी हेतूने कुडाळ महाविद्यालयाने हा दिवस साजरा केला .डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाह महेंद्र गवस उपस्थित होते . महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.एस.एस. लोखंडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. भारत तुपेरे तसेच गोपाळ हळदणकर आदी उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रतिष्ठित उद्योजक ए. टी. राणे यांनी आज महाविद्यालयाला कुटुंबासमवेत भेट देऊन रोख रुपये दीड लाख रुपयेचे डोनेशन क्लास रूम डेव्हलपमेन्ट साठी दिले. यावेळी प्राचार्यडॉ. स्मिता सुरवसे, महेंद्र गवस, सौ. मिलन राणे, डॉक्टर अस्मिता राणे, आदित्य राणे आदी उपस्थित होते.
