ऊस क्षेत्रात क्रांतिकारी संशोधन करून ३५ कांड्या पर्यंत उंच ऊस जात तयार करण्याचा माणस…

शरद पवार; दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकारच्या पाठीशी ठाम..

आंबोली,ता.२५: कृषी क्षेत्रात उसाची नवी क्रांती होण्यासाठी महत्वपूर्ण संशोधन यशस्वी करण्याचा प्रयत्न आंबोली येथे सुरु असून ३५ कांड्या पर्यंत उसाची उंची वाढणार आहे त्यातून जास्त साखर उत्पन्न मिळेल त्यासाठी आढावा बैठक घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊस संशोधन केंद्र आंबोली येथे सांगितले. यावेळी शरद पवार म्हणाले,पहलगाम हल्ला हा देशावर अतिरेक्यानी हल्ला केला आहे.त्याला केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन उत्तर द्यावे सरकारच्या पाठीशी सर्व पक्षांनी उभे राहिले पाहिजे त्यात कोणतेही राजकारण नाही. देशातील वातावरणाचा फायदा घेतला गेला त्यामुळे कटुता कमी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.केंद्र सरकार ने भूमिका घ्यावी आपण सरकार च्या मागे आहोत असे मत पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

You cannot copy content of this page