हुंबरठ ग्रामपंचायतला राष्ट्रीय पंचायत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार…

⚡कणकवली ता.२५-: राष्ट्रीय पंचायत दिवसाच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील हुंबरठ ग्रामपंचायतला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सन 2023/24 जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मान. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सिंधुदुर्ग नगरी येथे झालेल्या सोहळ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काळे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. पु. स्व.) श्री. परब यांचे हस्ते वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार सरपंच मनीषा मनोहर गुरव , ग्रामपंचायत अधिकारी वैभव वसंत ठाकूर ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वीकारला. हुंबरठ ग्रा प च्या माध्यमातून कणकवली तालुक्याला हा बहुमान मिळाल्याने कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनीही पुरस्कार प्राप्त हुंबरठ ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी वैभव ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page