Headlines

शरद पवार यांची शास्त्रज्ञ व संशोधकांशी चर्चा..

वेंगुर्ला प्रतिनिधी- केंद्रीय माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेटदेऊन शास्त्रज्ञ व संशोधकांशी चर्चा केली. तसेच फळ संशोधनाचा व कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधनाचा आढावा घेतला.
प्रारंभी कुलगुरू संजय भावे यांनी शरद पवार यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक गवाणकर यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या आजपर्यंतच्या कामाची सविस्तर माहिती दिली. विद्यापीठाचे सचिव हळदवणेकर, उद्योजक औदूत तिंबलो, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, व्हिक्टर डांन्टस, माजी मंत्री प्रवीण भोसले, अमित सामंत, अदिती पै, नम्रता कुबल, इर्शाद शेख, विधाता सावंत यांच्यासहित विविध संशोधक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी संशोधन केंद्राचे कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
फोटोओळी – कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी शरद पवार यांचे स्वागत व सत्कार केला.

You cannot copy content of this page