महसूल विभागातर्फे कट्टा येथे २४ रोजी समाधान शिबिराचे आयोजन…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील पेंडूर मंडळातील मौजे कट्टा येथे पेंडूर, पोईप, सुकळवाड, आंबेरी या मंडळातील गावांकरीता महसूल विभागामार्फत समाधान शिबीराचे आयोजन गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजन करण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न, जातीचे तसेच इतर सर्व दाखले, रेशनकार्ड वाटप तसेच रेशनकार्डमधील नाव कमी वाढ इत्यादी सेवा पुरविणे, तसेच संजय गांधी योजना, पीएम किसान योजना, अॅग्रीस्टैंक नौदणी इत्यादी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी या शिबीरास जास्तीत जास्त लाभार्थी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page