फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा; ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी…

तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना उद्या देणार आमदार महेश सावंत यांच्या उपस्थीत निवेदन,रूपेश राऊळ यांची माहिती..

सावंतवाडी ता. २०-:
फळपीक विमा योजना राबविल्या जाणाऱ्या कंपन्या बदलून शेतकऱ्यांना सरकार वेठीस धरत आहे त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने उद्या मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.यावेळी माहीम मतदारसंघातील आमदार महेश सावंत हे देखील उपस्थिथ राहणार आहे.असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी बोलताना सांगितले. दरम्यान सर्व संबंधित शेतकरी व बागायतदार यांनी तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.

You cannot copy content of this page