कणकवली: येथील धनंजय फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोमवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
धनंजय फाऊंडेशनच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती परीक्षा तसेच शैक्षणिक परिक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येते. कणकवली तेलीआळी येथील धनंजय फाऊंडेशनच्या मार्गदर्शन वर्गच्या ठिकाणी आयोजित या गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमाच्यावेळी डॉ. मीनल नागवेकर, डॉ.आराधना मेस्त्री, पत्रकार सुधीर राणे,पाटील ,पालव, धनंजय फाऊंडेशनचे मार्गदर्शक प्रदीप मांजरेकर, शिक्षिका सारिका काणेकर , सोनल चव्हाण तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेले इशान मयूर नागवेकर (राज्यात १६ वा, जिल्हयात पहिला),सोनिया चोडणेकर (जिल्हयात ८वी),श्रावणी वाळवे(२३वी),श्राव्या मेस्त्री(२९वी),राशी राणे (३४ वी),
भार्गव काणेकर(३९वा),श्रेया तांबे (५२ वा),मनीष पालव (गुणवत्ताधारक)
आरुष शेटटी ( गुणवत्ताधारक)
वेदांत बंड -(गुणवत्ताधारक) यांचा सत्कार करण्यात आला.
तर ५वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी डेलीशा सावंत (जिल्ह्यात सातवी,तालुक्यात प्रथम ),अर्णव पाटील (१० वा),आरोही मनोज मेस्त्री( १२वी),शाश्वत तांबे (३१वा),
सोहम वायंगवडेकर ( गुणवत्ताधारक),
परिणीती ठाकुर(गुणवत्ताधारक),
अंतरा गोंदले( गुणवत्ताधारक, नवोदय विद्यालय)या गुणवंतांचाही सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्याचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ – कणकवली येथे धनंजय फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सारिका काणेकर,सोनम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
धनंजय फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
