बांद्यात मोफत रक्त तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता,११-; भाजप बांदा शहर तर्फे बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, महिला शहराध्यक्ष स्मिता पेडणेकर व महिला शहर उपाध्यक्ष माधवी गाड यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांकरिता आयोजित करण्यात आलेल्या मोफत रक्त तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ९८ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात हीमोग्लोबीन, लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेटस, सर्व कोलेस्टॉल टेस्ट, किडनी फन्शन टेस्ट, लिवर फन्शन टेस्ट, थायरॉईड व रुग्णाकरिता आवश्यक सर्व रक्त तपासण्या केल्या गेल्या. सदर सर्व तपासण्या ह्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर व बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सौ. कोरगावकर म्हणाल्या, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्याकरता अशी रक्त तपासणी वर्षातून एकदा करून घ्यायला हवी. गुरु कल्याणकर म्हणाले, महिला वर्गाचा शिबिरासाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता असे शिबिर बांदा शहरातील प्रत्येक प्रभागात घेण्याचा पक्षाचा मानस आहे. महिला वर्गाच्या मागणीनुसार निश्चितपणे पुढील शिबिरे लावण्यात येतील.
यावेळी उपसरपंच आबा धारगळकर, महिला शहराध्यक्ष स्मिता पेडणेकर, महिला शहर उपाध्यक्ष माधवी गाड, शहराध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, तनुजा वराडकर, व्यंकटेश ऊरुमकर आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे रक्त तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

You cannot copy content of this page