मंत्री उदय सामंत यांचा उद्या पावशी येथे संपर्क दौरा…

⚡कुडाळ ता.०४-: राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नवनिर्वाचित शिवसेना संपर्क मंत्री सिंधुदुर्ग उदय सामंत हे उद्या शनिवार दिनांक५ एप्रिल रोजी कुडाळ येथे ‘संपर्क दौरा कार्यक्रम’ साठी येत आहेत. उद्या दुपारी २ वाजता शांतादुर्गा मंगल कार्यालय (वाटवे हॉल) मुंबई – गोवा हायवे, पावशी ग्रामपंचायत समोर, पावशी-कुडाळ येथे ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना पक्षाचे संपर्क मंत्री नामदार उदय सामंत उ‌द्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सिंधुदुर्ग जिल्हा करिता संपर्क दौरा जाहीर झाला असून संपर्क मंत्री श्री.उदय सामंत मार्गदर्शन करणार आहेत सदरील संपर्क दौरा कार्यक्रम उद्या शनिवार ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २०० वाजता, शांतादुर्गा मंगल कार्यालय (वाटवे हॉल) मुंबई – गोवा हायवे, पावशी ग्रामपंचायत समोर, पावशी-कुडाळ येथे संपन्न होणार आहे. यावेळी आमदार दीपकभाई केसरकर ( सावंतवाडी विधानसभा) , आमदार डॉ निलेश राणे (कुडाळ मालवण विधानसभा) रविंद्र फाटक – लोकसभा संपर्क प्रमुख (रत्नागिरी- सिंधुदुर्ग) उपस्थित राहणार आहेत. सर्व शिवसेना पक्षाच्या जिल्हा, तालुका ते शाखा प्रमुख स्तरापर्यंतचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधि व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उपनेते संजय आंग्रे आणि जिल्हाप्रमुख, दत्ताजी सामंत व संजु परब यांनी केले आहे..

You cannot copy content of this page