⚡देवगड ता.०४-: देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीच्या प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवार आठ मार्च रोजी सकाळी ११ वाजता (चिठ्या टाकून) आरक्षण निश्चित केले जाणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाव्दारे तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.
महाराष्ट्र अधिनियम क्रमांक२१/१९९४ नुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार शासनाने मुंबई ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक १९६४ मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारित तरतुदी निश्चित केलेल्या आहेत. सदर निवडणूक नियमातील नियम २ (अ) (१) (२) पोट कलम ४ ते ६ मधिल तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी व महिला सरपंच आरक्षित करावयाची आहेत.मा.ग्रामविकास विभाग, मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-य दिनांक ५ मार्च २०२५ व तसेच मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांजकडील पत्र क्र. साशा/डेस्क-१(३) / सरपंच आरक्षण/सोडत/०३/२०२५ दिनांक -२८.०३.२०२५ अन्वये देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित केले जाणार आहे.
सरपंच पदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची संख्या पुढील प्रमाणे असणार आहे. यामध्ये अनु.जाती आरक्षित पदे प्रवर्ग २, महिला २, अनु.जमातीसाठी आरक्षित पदे प्रवर्ग 0, महिला १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदे प्रवर्ग १०, महिला १० व खुला प्रवर्गामध्ये प्रवर्ग २३, महिला २४ अशाप्रकारे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने (चिठ्या टाकून) आरक्षण निश्चित केले जाणार आहे. तरी देवगड तालुक्यातील सर्व संबंधीत सरपंच / उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी नोंद घेऊन वरील पदाचे आरक्षण बाबत चिठ्या टाकण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी येथे उपस्थित रहाण्याचे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.
८ एप्रिलला देवगड तालुक्यातील ७२ सरपंच पदाची आरक्षण पध्दतीने सोडत…
