पिंगुळी ग्रा प चा ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ उपक्रम…

७ एप्रिल रोजी आम. निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ:मुले आणि पालकांसाठी विशेष परिसंवाद..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पिगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत आपल्या दारी हा अभिनव उपक्रम एप्रिल 2025 ते 31मार्च 2026 या कालावधीत विविध उपक्रमांनी राबविण्यात येणार आहे या मोहिमेचा शुभारंभ सोमवार 7 एप्रिल ला सकाळी नऊ वाजता भव्य ग्रंथ दिंडी मिरवणुकीने होणार आहे. तसेच त्यांनंतर परिसंवादाचाही आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होणार असून जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी पिंगुळी ग्रामपंचायत पहिलीच असल्याचे सरपंच अजय आकेरकर यांनी सांगितले. पिंगुळी ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वर्षभरात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत
   ग्रामपंचायत पिंगुळीच्या वतीने ग्रामपंचायत आपल्या दारी या अभिनव उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सरपंच श्री आकेरकर यांनीआज पत्रकार परिषद घेतली . यावेळी सागर रणसिंग, मंगेश चव्हाण, मंगेश मस्के, अन्वी बांदेकर, केशव पिंगुळकर, शशांक पिंगुळकर, ग्रामसेवक राजेश निवतकर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री आकेरकर म्हणाले, सात एप्रिलला सकाळी नऊ वाजता या मोहिमेचा उद्घाटन सोहळा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे  आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मोहिमेत  परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, प पू विनायक अण्णा राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, गावातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, वृद्ध, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, गावातील ग्रामस्थ गावातील सर्व ग्रंथाचे अध्यक्ष, प्रतिनिधी, महिला बचत गट, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडी सोहळ्यानंतर परमपूज्य समर्थ राऊळ महाराज  सभागृह येथे शालेय मुले व पालक यांच्यासाठी मोबाईल,आजची मुले व पुस्तक , मुलांचे हरवलेले बालपण या विषयावर मार्गदर्शन व परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ स्मिता सुरवसे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, ज्येष्ठ साहित्यिक भरत गावडे, प्रा रुपेश पाटील, साहित्यिक वृंदा कांबळी यांचा सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत परिसंवाद होणार आहे. मे व जून 2025 शेतकऱ्यांना कृषीविषयी मार्गदर्शन शिबीर खते बियाणे वाटप वृक्ष लागवड कार्यक्रम, जुलै व ऑगस्ट मध्ये आरोग्य तपासणी उपचार शिबिर, सप्टेंबर ,ऑक्टोबर 2025 ला स्वच्छता व श्रमदान शिबीर राबवणे, नोव्हेंबर ,डिसेंबर  25 मध्ये महिलांसाठी व्यवसायभिमुख व रोजगार विषयक मार्गदर्शन व महिला बचत गटासाठी अभ्यास दौरे आयोजित करणे,  जानेवारी 2026 पिंगुळी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव राबविणे, विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, फेब्रुवारी 2026 मध्ये अपंग कल्याण आर्थिक व सामाजिक मागास उन्नती अभियान अंतर्गत विविध सहायता उपक्रम राबवणे आदी वर्षभर हे कार्यक्रम होणार आहेत असे श्री आकेरकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page